प्रचिती स्कूलच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप
साक्री :- येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशी निमित्त गणरायास निरोप देण्यासाठी इयत्ता दुसरी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. गणपती रायाची प्रथम आरती प्रशांत भीमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, तुषार देवरे, वैभव सोनवणे, संयोजक वैशाली खैरनार, भूपेंद्र साळुंखे, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी देखील पूजेचा लाभ घेतला. गणपती रायास मोदकाचा नैवेद्य दाखविण्यात आला. याप्रसंगी इयत्ता दुसरीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मालपुर व कासारे येथे या विद्यार्थ्यांची रॅली घेण्यात आली. याप्रसंगी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी श्री गणराया या गाण्यावर नृत्य सादर केले. या उपक्रमासाठी वैष्णवी देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. लेझीम नृत्य प्रदर्शनासाठी कोमल बागले, सायली सोनवणे, डंबेल्स या नृत्यासाठी गीतांजली काकुस्ते, तेजस्विनी घरटे यांनी मार्गदर्शन केले. कासारे येथे गणरायास निरोप देताना सर्व विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा… जयघोष करीत निरोप दिला. या कार्यक्रमासाठी शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग व वाहन चालक वर्ग यांचे सहकार्य लाभले.