साक्री : “ब्ल्यू बर्ड ब्ल्यू बर्ड, फ्लाईंग व्हेरी हाय… अप अप टू द् ब्ल्यू -ब्ल्यू स्काय…. या सुंदर अशा इंग्रजी कवितेच्या ओवींनुसार प्रचिती प्री – प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निळया रंगात झेप घेतली. निमित्त् होत ते ब्ल्यू डे कार्यक्रमाचे. प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये मोठया उत्साहात ब्ल्यू डे साजरा झाला. शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सूरूवात झाली. विद्यार्थ्यांनी ब्ल्यू डे निमित्त माहिती सांगितली. निळा रंग शांती, आरोग्य आणि प्रसन्नतेचे प्रतिक आहे. निळा रंग प्रेरणा व श्रेष्ठतेने जोडलेला आहे, असे सांगत निळया रंगाचे महत्व विषद केले.
रंग व त्याचे महत्त्व सांगताना प्री-प्रायमरी प्रचिती स्कूलतर्फे नर्सरी ते १ली या वर्गातील विद्यार्थ्यांचा ब्ल्यू डे साजरा करण्यात आला. प्रचिती स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच प्राचार्या वैशाली लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निळ्या रंगाची ओळख चिमुकल्यांना करुन देण्यात आली. निळ्या रंगाच्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तूंची माहिती करून देण्यात आली. शाळेत सकाळी सर्वत्र परिसर निळया रंगाने बहरुन निघाला. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षक -शिक्षिका यांनी ही निळा पोशाख परिधान केला होता. विद्यार्थ्यांनी कोणी पृथ्वी तर कोणी जलचर प्राणी यांचे विविध आकार (माँडेल्स) बनवून आणले. या ब्ल्यू डे कार्यक्रमानिमित्त माहिती सांगताना कांचन अहिरराव यांनी जलसंरक्षण हा महत्त्वाचा संदेश हि विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यानंतर सविता लाडे यांनी उत्तम अशा आवाजात “ब्ल्यू बर्ड ब्ल्यू बर्ड, फ्लाईंग व्हेरी हाय… अप अप टू द् ब्ल्यू -ब्ल्यू स्काय…. हि सुंदर कविता इंग्रजी भाषेत सादर केली. या कार्यक्रमाचे संयोजन दिपमाला आहिरराव, श्वेता सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम पवार यांनी केले. कार्यक्रमाची उत्तम सजावट दिपमाला आहिरराव व किरण गवळी यांनी केली.