नृत्य सादरीकरण, स्वातंत्र्य गीत गायनाने प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा
साक्री : – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचा जयघोष केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सैनिक दिनेश भदाणे, शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्यां वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे व श्री तुषार देवरे यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे व ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. ध्वजगीत, राष्ट्रगीत, ध्वजसलामीनंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा भेटपत्रांचे प्रकाशन करण्यात आले. इ.२ री.ते इ.५ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिना निमित्त भाषणे केली. भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत १५० वर्षे होता. या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. या क्रांतिकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, महात्मा गांधी, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, पंडित जवाहरलाल नेहरु, यासारख्या अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या सर्व क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. तसेच १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरा करतो. या राष्ट्रीय सणाचा व देशाचा सार्थ अभिमान आहे.
स्वातंत्र्य भारताच्या सूशोभिकरणासाठी व पर्यावरण रक्षणासाठी आपण झाडे लावून झाडाचे संर्वधन करावे, असे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. त्यानंतर इ.३ री मधील विद्यार्थ्यांनी जय हो… देश रंगीला. रंगीला या रिमिक्स गाण्यावर देशभक्ती नृत्य, इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांनी ” डंबेल्स नृत्य”व देशभक्ती नाटक आणि इ. ५ वी व इ. ६ वीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. तसेच इ. नर्सरी ते इ. ३ रीच्या विद्यार्थीनी भारतमाता, स्वातंत्र्यवीर सावरकर , क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , इंदिरा गांधी यांच्या उत्तम वेशभुषा सादर केल्या. त्यानंतर इ. १०वी.मधील मृणाल बेडसे या विद्यार्थ्यांने “ऐ मेरे वतन के लोगो”…… देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या तिरंगा भेटपत्र रंगभरण स्पर्धा व गीतगायन स्पर्धा यात यशस्वी झालेल्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान पदक चिन्ह देऊन प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सविता ठाकरे यांच्या शिक्षक भाषणानंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य वैशाली लाडे यांनी भाषणातून सांगितले कि, भारतात सर्वात मोठा स्वातंत्र दिन भारताची राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर साजरा होतो. भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. त्यानंतर ते स्वातंत्र्य दिना निमित्ताने जनतेला संबोधित करतात. याच पार्श्वभूमीवर आपण ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत, असे सांगितले. त्यानंतर युकेजी मधील विद्यार्थ्यांनी शेवटी वुई शाँल अवर… वुई शाँल अवर कम….. या गीताचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थी भाषणाचे संयोजन हेमांगी बोरसे, जागृती जाधव यांनी केले. तसेच गीतगायन स्पर्धेचे संयोजन जयेश बागले, रूपेश कुवर आणि देशभक्ती गीत नृत्य पूनम पवार, लेझीम नृत्य गितांजली काकुस्ते, डंबेल्स नृत्य संयोजन प्रभावती चौधरी, देशभक्तीपर नाटकाचे संयोजन श्रावण अहिरे यांनी केले. परेड संचलन -कुणाल देवरे, तुषार सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमात रांगोळी व फलक लेखन किरण गवळी, भू्पेंद्र साळुंखे, दिपमाला अहिरराव यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीतू पंजाबी यांनी केले. आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजन जागृती जाधव व जयेश बागले यांनी केले. इतर सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, ड्रायव्हर बंधू, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयोजनातून व सामूहिक सहकार्याने एकत्रित स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आनंद -उत्साहात पार पडला.