प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये देश स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल येथे 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देश स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सैन्य अधिकारी सूर्यकांत अहिरे, शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

आराध्या शेवाळे हिने पाहुण्यांचे औक्षण केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी यांनी परेड संचलन करून पाहुण्यांना आमंत्रित केले. यावेळी राष्ट्रगीत झेंडा गीत देशभक्तीपर गीत गीताने परिसरात उत्साह भरला. ‘भारत माता की जय वंदे मातरम’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे केली. विद्यार्थ्यांनी आर्ट क्राफ्ट मेकिंग ग्रीटिंग कार्ड व कोलाज मेकिंग वस्तू तयार करून आणून त्या वस्तूंचे पाहुण्यांनी कौतुक केले. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी त्वरिका ढोले, शिवन्या कदम (भारत माता), ईश्वरी नंदन, विधी कुवर, आरुषी बताव यांनी “झाशी की राणी” क्रियांश खैरनार ( पंडित जवाहरलाल नेहरू), विघ्नेश कोठावदे, आदित्य एळखंडे (लोकमान्य टिळक), वंशिका भामरे- नेता, रुद्रांश नंदन, अनिश – सुभाष चंद्र बोस, आर्य गांगुर्डे -सावित्रीबाई फुले, अर्जित कोतकर – पोलीस, कार्तिक कोठावदे – सुभाष चंद्र बोस असे राष्ट्रीय नेत्यांचे पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांची आठवण करून दिली, तसेच आत्मविश्वासाने कार्य करा, यश नक्कीच मिळेल असा संदेश प्रमुख पाहुणे सूर्यकांत अहिरे यांनी दिला. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे यांनी आपल्या भाषणातून भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या बलिदानाचे कहानी सांगितली. मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. सुनिता जाधव व रिनल सोनवणे यांनी स्वातंत्र्यदिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमासाठी रांगोळी व फलक लेखन अश्विनी पगार, तेजल पंडित यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन अर्चना देसले यांनी तर शितल वाघ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
























