प्रचिती पब्लिक स्कूलने जपली सामाजिक बांधिलकी; पोलीस, डॉक्टर बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थीनींनी समाजाची सेवा करणारे पोलीस बांधव आणि रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. विद्यार्थीनींनी पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक जयेश ड़ी. खलाणे यांच्यासह पोलीस बांधवांना राखी बांधली. तसेच, ग्रामीण रुग्णालयात राजीव पाटील व पंकज पगारे यांच्या उपस्थितीत डॉक्टर बांधवांना राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या. या अनोख्या उपक्रमाची परिसरात एकच चर्चा झाली.
यावेळी, स्कूलचे समन्वयक राहुल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्या शिक्षक – विद्यार्थिनी उपस्थित होत्या.प्रचिती पब्लिक स्कुल येथे दरवर्षी प्रमाणे बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने झाली. शिक्षिका सरिता अहिरे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व विषद केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी आपल्या भाषणातून बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन साजरे केले जात असल्याचे सांगितले. समन्वयक राहुल अहिरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नर्सरी ते ८ वी च्या विद्यार्थीनींनी मुलांना राखी बांधून रक्षणाची शपथ घेतली.
तसेच नर्सरी ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करणे आणि इयत्ता ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. तसेच, १ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमासाठी किरण देसले, अर्चना देसले, शितल वाघ, माधुरी शिंदे, सुनिता जाधव, रिनल सोनवणे, जागृती बिरारीस, तेजल पंडित यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पगार, काजल राजपुत यांनी केले. यावेळी शाळेतील वाहन चालकबंधूंना राखी बांधुन शुभेच्छा देण्यात आल्या.