प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे दहीहंडी उत्सव साजरा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे मोठया उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला हा उत्सव विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वांसाठी एक आनंददायी अनुभव ठरला. विद्यार्थ्यांनी दहीहंडी साजरी करण्यात मोठी उत्सुकता दाखवली.
कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदशनाखाली दहीहंडी उत्सव मोठया आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्तज्वलन, कृष्णाच्या मुर्तीच्या पुजनाने झाली. कृष्ण जन्माष्टमी पुजनानंतर पाळणा गीत गायन करण्यात आले. कार्यक्रमासाठी नर्सरी, युकेजी, एलकेजीचे विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभुषा साकारून आनंद व्यक्त केला. श्रीकृष्णाची जीवन गाथा राहुल अहिरे यांनी मांडली. आजच्या कार्यक्रमाचे संयोजन किरण देवरे यांनी केले. कार्यक्रमासाठी हंडी सजावट अर्चना देसले व माधुरी शिंदे यांनी केली. इयत्ता ६ वी व सातवी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी थर रचून युकेजीच्या केशव शुक्ला या चिमुकल्याने दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाची सांगता काजल राजपुत यांनी आभार प्रदर्शनानी केली. यावेळी, दहीहंडी दरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली. दहीहंडी सोबतच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्कूलचा परिसरात दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सजावट करण्यात आली होती. दहीहंडी खेळणे खूप मजेदार होते. मित्रांसोबत मिळून दहीहंडी फोडणे खूप छान अनुभव होता. स्कूलने असा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
“विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला खूप समाधान वाटत आहे. दहीहंडी हा केवळ एक खेळ नसून, एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि सहकार्य वाढेल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
पालकांचे देखील या आनंदात सहभागी झाले. स्कूलने दहीहंडी सारखा पारंपरिक उत्सव साजरा करून चांगले काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रचिती स्कूल अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करीत असल्याचे सांगत स्कूल प्रशासनाचे आभार मानले.