प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीचा उत्साहात
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे तसेच शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे आणि पाळण्याचे पूजन करण्यात आले.
तुषार सूर्यवंशी यांनी गोकुळाष्टमीची माहित दिली. या श्रावण महिन्यातील तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची ही प्रथा हिंदू परंपरेमध्ये आहे. श्रीकृष्ण जन्माच्या दिवशी भागवत प्रथेनुसार श्रीकृष्णाच्या जन्मावर आधारित नृत्य, नाटक, भक्तीगीते सादर केली जातात. उपवास व पूजा रात्रीचे जागरण करून आणि पुढील दिवशी महोत्सव आणि जन्माष्टमी उत्सवांमध्ये समावेश होतो. श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो. नंदाने श्रीकृष्ण जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या. श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी तयार केलेल्या विशिष्ट प्रसादास गोपाळकाला असे संबोधले जाते, असे त्यांनी सांगितले. श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो. त्याचे सेवन करून लोक उपवास सोडला जातो. “गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला.” असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी दहीहंडी फोडतात. या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत उंच मटक्यात दही दूधाने भरलेली हंडी ठेवून तेथे मानवी मनोरा उभारून ती हंडी फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्य उत्सव आहे, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
श्रीकृष्ण व्रज मंडळात गाई चारतांना आपण आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला. या कथेला अनुसरून श्रीकृष्ण अष्टमीच्या दिवशी एक सजवलेल्या मटक्यात काला करून ते दोरीच्या साह्याने उंचावर भरण्याची व मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते. यावेळेस गाणी, नृत्य विविध कार्यक्रम होतात. हा उत्सव पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमलेली असते. गोपाल म्हणजे गाईचे पालन करणाऱ्या श्रीकृष्णाच्या या जन्मोत्सव निमित्त काल्याचा प्रसाद केला जातो यालाच गोपालकाला असे म्हणतात, असे मत मुख्याध्यापिका प्राचार्या वैशाली लाडे यांनी व्यक्त केले. यानंतर इ.३री तील विद्यार्थी -विद्यार्थीनींनी श्रीकृष्ण जन्मावर आधारीत सुंदर नाटक सादर केले. इ. २ री मधील विद्यार्थी -विद्यार्थीनींनी राधाकृष्ण रासलीला नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी मनोरे बनवून दहीहंडी फोडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. ८ वी अ ची विद्यार्थिनी भार्गवी ठाकरे, इ. ८ वी ब ची विद्यार्थिनी निकिता देसले यांनी केले. कार्यक्रमात उत्तम राधाकृष्ण रासलीला नृत्याचे संयोजन पूनम पवार व गीतांजली काकूस्ते यांनी केले. श्रीकृष्ण जन्मावर आधारीत नाटक रोहिणी सोनवणे, जागृती जाधव यांनी संयोजन केले. उत्तम रांगोळी व फलक लेखन, मटकी सजावट किरण गवळी, सविता लाडे, वैष्णवी देवरे, सविता ठाकरे, भूपेंद्र साळुंके, दिपमाला आहिरराव यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन श्वेता सोनवणे, दिपमाला अहिरराव यांनी केले.