साक्री : शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियानास तालुक्यातील म्हसदी गटातून सुरुवात करण्यात आली. गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली.
याप्रसंगी शिवसेना महिला संघटक कविता क्षीरसागर, शिवसेना तालुका प्रमुख विशाल देसले, साक्री विधानसभा संघटक पंकज मराठे, उपजिल्हा प्रमुख भूपेश शाह, तालुका उपप्रमुख पंजाबराव गांगुर्डे, विभाग प्रमुख भरत जोशी, विटाईचे सरपंच वकील खैरनार, सतीश खैरनार, रमेश खैरनार, भीमराव खैरनार, राजधर खैरनार उपस्थित होते.
विटाई गावात ग्रामस्थांची भेट घेऊन समस्या जाणून घेत काटवान भागातील अनेक गावांना पाण्याची टंचाई निर्माण होत असते. यासह अनेक समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विशाल देसले यांनी समस्यांचा पाठपुरावा करून जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यामार्फत सोडविण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शाखा प्रमुख, बुथ प्रमुख यांच्या नियुक्त्या करण्यात
आल्या. भविष्यात होणार्या निवडणुकांना शिवसेना विश्वासाने समोर जाईल, असा विश्वास शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला.