प्रचिती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उधळला ‘प्रचिरंग; वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम ‘उत्साहात साजरा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे 3 फेब्रुवारी 2025 रोजी “प्रचिरंग” या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
” रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, रंगाने केला माझ्या आयुष्याचा सोहळा”
असे हे माणसाचे आयुष्याला सर्वांगाने व्यापलेले रंगाचे गारुड कायम सोबत असते. कधी नात्यांचा रंगांमध्ये विणले जाते तर कधी मैत्रीच्या कधी प्रेमाच्या रंग यामध्ये गुलाबी रंग तर अधिक गहिरे होऊन मनाला स्पर्श करतात.
याप्रसंगी, शिक्षण क्षेत्रात यशस्वीपणे उजळून टाकणारी कर्तबगारी दाखविल्या बद्दल सलग तीन वेळा खानदेश रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आई एकविरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खान्देश रत्न, खान्देश भूषण शिक्षण महर्षी प्रशांत भीमराव पाटील, कविता पाटील (सेक्रेटरी ), प्राचार्य अनिता पाटील, व्यवस्थापक- राहुल पाटील, राखी संजय हसानी (पिंपळनेर ), रोहिणी शिवाजी भवरे (पिंपळनेर), मोहिनी अजय सूर्यवंशी (पिंपळनेर), अंजली शांताराम बहिरम (सुकापुर), हर्षदा दिनेश नहिरे (पिंपळनेर), सपना अनिल चव्हाण (पिंपळनेर ), प्रीती सागर देवरे (जेबापूर ), प्रियंका गजेंद्र शिंदे (देश शिरवाडे), भारती राहुल पाटील (पिंपळनेर) हे सर्व मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवी सरस्वती माता व नृत्याचे देवता नटराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूर्ती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. निसर्गात अनेक रंग दडलेले आहेत, इंद्रधनुष्याचे रंगासारखे आपल्या जीवनात पण वेगवेगळे रंगाच्या थेट प्रभाव पडतो, प्रत्येक रंग मनुष्याच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य वर प्रभाव सोडतात. प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक मानसिक विकास केला जातो, असे उत्कृष्ट शाळेत मुलं व मुली शिक्षण घेत आहेत. अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकास घडवून सर्वांगीण विकास साधत असतात. अभ्यासक्रम, उपक्रम, कार्यक्रम विविध खेळ विविध स्पर्धा विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या गुण कौशल्याचा विकास केला जातो, हेच विद्यार्थी भविष्यात चांगल्या क्षेत्रात जाऊन प्राविण्य मिळवतात व सर्वांना विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव दिला जातो. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इयत्ता नर्सरी ते इयत्ता आठवीचे विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यविस्काराने सर्वांचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांच्या नृत्यातून आपली संस्कृती म्हणजे आपले भारतीय सण, संस्कृती आपले दैवत जीवनातील विविध रंगाने रंगलेले आपली परंपरा गणपती वंदना, स्वागत नृत्य, तानाजी, लावणी विविध देवीचे रूप, मैत्री, मुली व वडिलांचे सुंदर असे नातं पंजाबी, राजस्थानी, मराठी, महादेवाचे तांडव नृत्य आदी या सर्व गाण्यांमधून इंद्रधनुष्य सारखे वेगवेगळे रंगामध्ये रंगून विद्यार्थ्यांनी नृत्यातून जाणून घेतले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गाण्याची निवड व नृत्यविष्कार हा शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून आपल्यातील कलागुण दाखवून नृत्य सादर करून घेतले. या कामासाठी सुंदर रांगोळीचे रेखाटन शिक्षकांनी केले.
या कामासाठी सुंदर रांगोळीचे रेखाटन रिनल सोनवणे, वैशाली वाघ, अनिता पवार, सरिता आहिरे, पल्लवी आहिरे यांनी केले. तसेच स्टेज डेकोरेशन काजल राजपूत, जागृती बिरारीस, अनिता पवार यांनी केले. दीप प्रज्वलनाचे डेकोरेशन कल्याणी काकुस्ते, पल्लवी आहिरे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल राजपूत व मयुरी सोनार यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अर्चना देसले, अश्विनी पगार यांनी केले. किरण पाटील, योजना अकलाडे, नेहा शिरसाठ, सरिता आहिरे, रुपेश कुवर यांचे असे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी समाधान सोनवणे, पगारे काका व वैशाली मोरे, वाहन चालक यांनाही परिश्रम घेतले. तसेच प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य- वैशाली लाडे, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखिल मोलाचे सहकार्य लाभले.
शिक्षकांनी विविध गीतांचे सुंदर असे फ्युजन संगीत व ग्राफिक्स तयार करून प्रेक्षकांना मोहित केले. सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सुंदर असे नृत्य सादर केले. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय उत्साहात, आनंदात पार पाडण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल राजपूत व मयुरी सोनार यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अर्चना देसले, अश्विनी पगार यांनी केले. तसेच किरण पाटील , योजना अकलाडे, नेहा शिरसाठ , सरिता आहिरे, रुपेश कुवर यांनी केले. आभार प्रदर्शन सरिता आहिरे यांनी मानले.