प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालकलाकारांच्या नृत्याने रंगला “प्रचिरंग” वार्षिक स्नेहसंमेलनाचा- “बॉलीवूड नाईट” महोत्सव
साक्री :- प्रचिती इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने दि.१ व २ फेब्रुवारी, शनिवार व रविवार रोजी दोन दिवसीय प्रचिरंग वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील, कविता पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गायत्री ज्ञानेश्वर मोरे (दातर्ती ),स्नेहा संदीप साळुंखे (शेवाळी ), जयश्री दिनेश ठाकरे (प्रतापपूर), रूपाली योगेश पवार (साक्री), पूजा कुणाल अहिरराव (धाडणे), पुनम शरद पवार- ( दिघावे), विद्या कुंदन पाटील- (बोनगांव), सुनंदा जिभाऊ वाघ -(धमनार ), दीपिका कमलाकर सोनवणे -(मलांजन ), वनिता अभिजीत भामरे -(साक्री), शारदा भास्कर देवरे -(म्हसदी), निशा भूषण बदामे-(निजामपूर ), श्वेता उमाकांत देशपांडे- (साक्री), वैशाली सावता गवळी- (नेर), वैशाली उत्तम मारनार- (नांदवण), रूपाली हर्षदीप पाटील-(दहिवेल ),माधवी नितीन देसले-( कासारे),कविता भटू बच्छाव- (बेहेड) तेजस्विनी हितेंद्र ठाकरे- (कळंभीर)
सरिता शरद पाटील- (किरवाडे)
सोनाली नितीन ठाकरे-(राऊड),
धनश्री नितीन ठाकरे (काळगाव), कुणाल देवरे, नम्रता गोसावी, सुनिता पाटील, स्मिता नेरकर, वैशाली खैरनार, रोहिणी सोनवणे, तुषार सुर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती नृत्य व कलेची देवता नटराजन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान वनिता भामरे, पुनम पवार, वैशाली गवळी यांची अध्यक्षीय भाषणे झाली. त्यांनी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, प्रचिती इंटरनॅशनल स्कुल हि धुळे जिल्ह्यातील एक आदर्श शाळा आहे. या शाळेला सलग ५ वर्षे उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार मिळालेला आहे. अशा उत्कृष्ठ शाळेत आमची मुले- मुली शिक्षण घेतात. याचा आम्हाला अभिमान आहे. येथील अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौध्दीक विकास घडवून सर्वांगिण विकास साधत असतात. अभ्यासक्रम, उपक्रम, कार्यक्रम,
विविध खेळ, विविध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करून विद्यार्थ्याच्या गुण कौशल्याचा विकास केला जातो. या शाळेतून बुध्दीमान विद्यार्थी निर्माण होत असतात. हेच विद्यार्थी भविष्यात चांगल्या क्षेत्रात जाऊन प्राविण्य मिळतील असा आमचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. प्रचिरंग स्नेहसंमेलनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. आम्हाला प्रचिरंग वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मान्यवर म्हणून आम्हाला आपण दरवर्षी आमंत्रित करत आहात. त्याबद्दल त्यांनी शाळेचे आभार व्यक्त केले.
तत्पूर्वी, प्रचिरंग स्नेहसंमेलनाची सुरवात सूर निरागस, गजानना, मोरया मोरया…या श्रीगणेश गीत-नृत्याने व सरस्वती वंदना वर दे..वर दे…या स्वागतगीत नृत्याने करण्यात आली.
प्रथम दिनी- सुर निरागस हे गजानना मोरया मोरया..
सरस्वती वंदना वरदे वरदे… वेलकम… (इयत्ता-नर्सरी) राजे आले राजे आले दैवत.. ( इयत्ता-युकेजी डायमंड) छत्रपती..तेरी झलक शरपी… (इयत्ता- युकेजी गोल्ड) नखरेवाली राणी सांग सांग.. (इयत्ता -नर्सरी) बम भोले बम मेरा जूता जपानी… (इयत्ता- युकेजी गोल्ड) डिस्को दिवानी… आपके आ जाने से… (इयत्ता युकेजी सिल्वर) पंजाबी थीम… (इ.८वी-ब ) रफ्ता रफ्ता…( इ.- १ली. क) टन टन… (इयत्ता -नर्सरी) मी आहे कोळी रुपेरी वाळू… (इयत्ता युकेजी गोल्ड) चंद्रा परम सुंदरी…. (इ.८ वी.अ) हवाहवाई… (इयत्ता -युकेजी गोल्ड) नन्ना नन्ना रे… (इयत्ता.- युकेजी डायमंड) छत्रपती शिवाजी महाराज.. (इ.९ वी.) आय लव यू डॅडी…. (इयत्ता- युकेजी डायमंड )मोरनी बनके… (इ.१ली-अ) चिटिया कलया… एक दो तीन….( इयत्ता- युकेजी गोल्ड) गलतीसे मिस्टेक… (इ.१ ली-क) साउथ सॉंग..( इ.९वी.) ताल से ताल मिला…( इयत्ता- युकेजी गोल्ड) ये कैसा लडका है… (इयत्ता- युकेजी सिल्वर ) तेरा ही जलवा… (इयत्ता- युकेजी गोल्ड )आय एम डिस्को… (इ. १ली.ब) आदिवासी जंगल रखवाला… (इयत्ता- युकेजी डायमंड) पप्पू डान्स…( इ.१ली-ब) तेरे इशारे पे… (इ.८वी.अ) फनी डान्स..(इ.९वी.)भांगडा चलना..(इ८-वी-ब). तसेच द्वितीय दिवशी गणपती सॉंग (इ.३री-ब व इ.६ वी-अ), स्वागत नृत्य (इ.६वी-अ), पंजाबी नृत्य-(इ.३री-अ)
तांडव ..जेठा ठेवी.. गलतजले…(इ.३री.अ), उदे ग अंबे उदे अंबाबाई गोंधळाला ये…(इ.२री-अ/ब), सैनिकी देशभक्ती नृत्य व नाटक (इ.३री ब), जय मल्हारी माय भवानी…(इ.५वी अ), अंगना मे बाबा मै तो रस्ते से जा रहा था…(इ.४थी अ) उधळ हो आली ठुमकत पाटलांचा बैलगाडा..(इ.५ वी-ब) एकच चाले… आदिवासी चाले अमु काका बाबांना पोऱ्या रे…(इ.६वी-ब) लल्लाटी भंडार आई भवानी तुझ्या कृपेने…(इ.३री-अ) उडी उडी जाय … पिचकारी….गुढीपाडवा रक्षाबंधन…(इ.७वी.) कालेमेघा काले मेघा पानी तो बरसा….(इ.४ थी.-ब), झुमका वाली पोर घडीन काटा…(इ.७ वी.) तेरे मन मे शिवा मेरे मन मे शिवा मर्द….(इ.२री-अ/ब)…ओ कृष्णा कान्हा सोजा रे….(इ.२री.अ/ब), वेसाची पारू…मीआहे कोळी….(इ.२री-अ/ब), हीरोइन डान्स (इ.३री.) छबीदार छबी (इ.४थी.-ब),मेरे महबूब मेरे सनम….(इ.७वी.) पुष्पा-(इ.४थी.), बनके तितली…(इ.५वी.ब), भागवत गीता थीम..(इ.५वी.-अ) मे कोल्हापुर से आई हु..(इ३री-ब), सखिया घुंगरू टूट गये..(इ६ वी.-ब) आपली यारी एक नंबर…(इ६वी-अ), घूमर राजस्थानी नृत्य (इ.५वी-अ) कचकच कांदा…. (इ.७वी.) इत्यादी गाण्यांवर इ.- नर्सरी ते इ.१०वी.पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर करून सर्व श्रोत्यांची मने आकर्षित करून घेतली. विद्यार्थ्यांना आपल्या हक्काचं व्यासपीठ नृत्याने गाजवता आले.
शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुप्तकला गुणांचा विकास व्हावा. यासाठी शाळेमध्ये दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जात असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मंचावरील आत्मविश्वास वाढतो. तसेच त्यांना विविध अंगी असलेल्या कलांचे प्रदर्शन करता येते. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल दरवर्षी विद्यार्थ्यांना आपले कला गुण मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी प्रचिरंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करत असते. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणावर सदैव भर देत असते. या शाळेला सलग ५ वर्षे उत्कृष्ट शिक्षण संस्थेचा पुरस्कार मिळाला असून या वर्षी शैक्षणिक वर्ष २०२४- २५ चा उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. ही एक गौरवशाली बाब आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देत आलो आणि आम्ही भविष्यात उत्कृष्ट शिक्षण देण्यावर सदैव भर देऊ, असे मत प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी दरवर्षी सहकार्य करणारे मंडप डेकोरेटर पिंटू मुसळे, एलईडी लाईटिंग योगेश बोरसे (सहारा मूवी, सटाणा) चेतना साऊंड सिस्टम – राकेश देवरे, फोकस लाईट्स बाबा मराठ, साक्री आचारी कैलास शर्मा आणि फोटोग्राफर – मिलिंद देवरे यांचा देखील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी भक्ती आणि शक्तीचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवरायांची व संत तुकाराम यांच्या मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बोरसे, श्रावण अहिरे, नीतू पंजाब, जितेंद्र राजपूत, सपना देवरे, राहुल पाटील यांनी केले. पहिल्या दिवसाचे संयोजन वैभव सोनवणे, कुणाल देवरे, सुनीता पाटील, नम्रता गोसावी यांनी केले. दुसऱ्या दिवसाचे संयोजन तुषार देवरे, स्मिता नेरकर, वैशाली खैरे, रोहिणी सोनवणे यांनी केले. रांगोळी सजावट व फलक लेखन किरण गवळी, भुपेंद्र साळुंखे, मनोज भिल, सविता लाडे, दिपमाला अहिरराव यांनी केले. तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका- शिक्षकेतर कर्मचारी, वाहन चालक तसेच सर्व शालेय कर्मचारी यांच्या सहकार्याने वार्षिक प्रचिरंग स्नेहसंमेलनाचा “बॉलिवूड नाईट” हा महोत्सव मोठ्या आनंदा उत्साहात पार पडला.