प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनेने करण्यात आली. त्यानंतर किरण देवरे यांनी आपल्या भाषणातून फितूर जन्मले इथे ही जीर या मातीची खंत आहे, तरी राजे शिवाजी व राजे संभाजी मराठ्यांच्या छातीत जिवंत आहेत, असा शिवघोष केला. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. इयत्ता 2 री ची पूर्वा शेवाळे इयत्ता 4थी चा सर्वेश खैरनार, श्रेयस शेवाळे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा व गीत गायन केले. इयत्ता आठवीचे विद्यार्थी ऋषिकेश जाधव, तेजस खैरनार, प्रथम चौरे, प्रणव सोनवणे यांनी शिवगर्जना करून सर्व वातावरण शिवमय केले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उत्साह व आनंद दाखवला. इयत्ता ३रीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्य प्रदर्शनातून शिवाजी महाराज व तानाजी यांच्या जीवनाविषयी सादरीकरण केले. त्यांना वैशाली वाघ यांनी मार्गदर्शन केले. तसेच इयत्ता ३री, ४ थी, ५ वी च्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य प्रदर्शनातून महाराजांना वंदन केले.
शिवजयंती कार्यक्रमानिमित्त शिवरायांची आठवण व त्यांच्या प्रतिमा डोळ्यासमोर यावी, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा शाळेतील विद्यार्थी यांनी साकारली. तसेच विद्यार्थिनींनी नऊवारी साडी, पांढरा कुर्ता भगवा रंगाच्या वेशभूषेत कार्यक्रमात उत्साह आणला. नर्सरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांबद्दल घोषवाक्य व मोठ्या आवाजात व उत्साहात शिवगर्जना करण्यात आली. कार्यक्रमासाठी जागृती बिरारीस , सुनीता जाधव, योजना जाधव यांनी सुंदर रांगोळी रेखाटली. अर्चना दिसले, किरण देवरे, कल्याणी काकुस्ते, सरिता अहिरे, नेहा रोकडे यांनी सजावट केली. सरिता अहिरे यांनी पालखीचे नियोजन केले. अश्विनी पगार, कल्याणी काकुस्ते, अनिता पवार यांनी सिंहासन तयार केले. कार्यक्रमाचे संयोजन काजल राजपूत तर सूत्रसंचालन रिनल सोनवणे यांनी केले. छायाचित्र नेहा रोकडे, चित्रफित मयुरी सोनार यांनी काढले. सुनिता जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.