साक्री: प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये मंगळवार, दि.१८ रोजी “जय भवानी, जय शिवाजी” च्या शिवगर्जना देत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच, शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे प्रशांत पाटील, शाळेच्या वैशाली लाडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे इ.७ वी.व इ.६वी वर्गातील विद्यार्थिनींनी सुंदर लेझीम नृत्यद्वारे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे तसेच कार्यक्रमाचे संयोजक श्रावण अहिरे, जागृती जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले.
पाहुण्यांच्या स्वागत सत्कारानंतर (इ.३री-ब) मधील विद्यार्थिनी हुसेनीनाज अशफक शेख, आरोही देसले-(इ.५वी.अ), धृव नेरे, चैतन्य बेडसे- ( इ.४थी.अ), स्वरा सावंत (इ.३री-अ), प्रणव ठाकरे(इ.९वी), तेजस्वीनी पाटील (इ.३री.अ), पुनित ठाकरे (इ.४थी-ब) व शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, शिक्षिका अश्विनी ठाकरे, शाळेचे शिक्षक रवींद्र सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी भाषणे दिली. “लखलख चमचम तळपत होती. शिवबाची तलवार… महाराष्ट्राला घडवणारे तेच खरे शिल्पकार…शिवरायांचे आठवावे रूप…शिवरायांचा आठवावा प्रताप…साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीत एक कर्तुत्ववान वीर पुत्र जन्मला. ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने व मूठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकुळ माजवत होत्या. मोघलांच्या कैदीत लाखो मराठा सैनिक कितपत पडले होते. अनेक स्त्रियांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्याचा कोणी कैवारी नव्हता, अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता. तो एक झंकार झगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊ च्या पोटी सिंह जन्मला. ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात सच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या १६ व्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले. ते पूर्णत्वास नेले. त्यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थितीची जाणीव करून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आदर निर्माण केला. या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद मुरारबाजी, यशाजी कंक यासारख्या सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणाचाही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवरायानंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज यांचे कारण आहे. त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चरित्र शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटालाही हात लावता कामा नये. असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटायचे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. फक्त माझा शिवबा होता. असे बोलत छत्रपती शिवाजी महाराज की जय….असा अनमोल संदेश छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भाषणातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. हार्दीका माळीचकर (इ.८वी-अ) या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. त्यानंतर (इ.८वी.अ) मधील विद्यार्थ्यांनी “जय भवानी जय शिवाजी” “श्री..श्री…श्री..छत्रपती शिवाजी महाराज की जय”….अशा शिवगर्जना दिल्या. त्यानंतर (इ.२री.अ/ब) मधील विद्यार्थ्यांनी तेरे मन में शिवा, मेरे मन मे शिवा.. व इ.९ वी.मधील विद्यार्थ्यांनी “आ हो राजे.. शंभूराजे”….व इ.३री.ते इ.६ वी. मधील विद्यार्थ्यांनी “जय जय शिव राज हे… या गाण्यावर सुंदर असे नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विद्यार्थी नृत्यांचे संयोजन- गीतांजली काकुस्ते, सपना ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाची सुंदर सजावट, रांगोळी रेखाटन आणि फलक लेखन याविषयी संयोजन शाळेचे कलाशिक्षक –
भूपेंद्र साळुंखे, मनोज भिल, जितेंद्र कासार, वैष्णवी देवरे, दीपमाला अहिराव, सविता लाडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- सपना देवरे, इ.७ वी. मधील विद्यार्थिनी- आराध्या शिरसाठ व कृतिका नेरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन श्रावण अहिरे व जागृती जाधव यांनी केले. शेवटी “जय भवानी जय शिवाजी” च्या गजरात सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या आनंदात, उत्साहात पार पडला.