प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा
साक्री :- प्रचिती इंटरनॅशनल प्री-प्रायमरी स्कूल च्या वतीने विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा बुधवार, दि. 5 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे, राजेंद्र जगताप, अंकिता हिरे, मनिषा खैरनार आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांच्या स्वागत सत्कारानंतर प्री-प्रायमरी युकेजीच्या शिक्षिका हिरल सोनवणे, कांचन अहिरराव, अश्विनी ठाकरे, प्राचार्य वैशाली लाडे, प्रियल पवार, उर्वी लाडे, रुद्र साळुंखे यांनी मनोगतातून पदवीदिनाचे महत्त्व पटवून दिले.
पदवीदान समारंभास प्री- प्रायमरीमधील चिमुकल्यांनी पदवीदान समारंभाच्या टोप्या परीधान करून व्यासपीठाचा अभिमान वाढवला. प्राचार्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राने गौरवून चिमुकल्यांचे कौतुक करण्यात आले. मुलांनी परिधान केलेल्या वेशभूषेने पदवीदान समारंभात रंगत आणली.
प्राचार्य वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना पदवीदान गौरव प्रमाणपत्र प्रदान करतांना या दिवसाचे महत्त्व पटवून दिले. हा दिवस केवळ लहान मुलांसाठीच नाही तर शिक्षकांसाठी सुद्धा अभिमानाचा आणि आनंदाचा आहे, असे सांगून लहान पदवीधरांना शाळेकडून शुभेच्छा देण्यात आल्या. आयुष्यातील पहिली पदवी घेतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. उच्च शिक्षण घेऊन आपलं भविष्य उज्वल करणे ही आपली सर्वस्वी जबाबदारी आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना पदवीदिनानिमित्त करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून पदवीदान दिनाची पार्श्वभूमी निर्माण केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बादल पे पाव है……एक जिंदगी ….या गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता पाटील, श्वेता सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाची सुंदर सजावट व फलक लेखन शाळेचे कलाशिक्षक- भूपेंद्र साळुंखे, दीपमाला अहिरराव, मनोज भिल, जितेंद्र कासार यांनी केले. विद्यार्थी नृत्याचे संयोजन गीतांजली काकुस्ते व पुनम पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन हिरल सोनवणे, कांचन अहिरराव यांनी केले.