प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेरमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे आज, 8 मार्च 2025 रोजी ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात पार पडला. एक स्त्री आई, बहीण, वहिनी, पत्नी, मुलगी, गृहिणी सोबतच वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये ती शिक्षिका, डॉक्टर, वकील, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, आयपीएस अधिकारी अशा अनेक भूमिका पार पाडत असताना तारेवरची कसरत करावी लागते, त्यांच्या दैनंदिन कार्याचा गौरव म्हणून महिला दिन साजरा केला जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्कूल मधील महिला शिक्षकांचा विद्यार्थिनींकडून सत्कार करण्यात आला. यावेळी, स्कूलच्या प्राचार्य अनिता पाटील, समन्वयक राहुल अहिरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनी व महिला शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमावेळी महिला शिक्षकांचे विविध खेळ घेण्यात आले. खेळाचे आयोजन अर्चना दिसले, अश्विनी पगार यांनी केले. टॅलेंट शो, क्विज कॉम्पिटिशन, ॲक्शन वर्ड शो चा महिला शिक्षकांनी आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी मयुरी सोनार, नेहा रोकडे यांनी रेखाटली. या कार्यक्रमाची सजावट किरण देवरे, वैशाली वाघ, अनिता पवार यांनी केले. सूत्रसंचालन सुनिता जाधव तर छायाचित्र कल्याणी काकुस्ते, काजल राजपूत यांनी काढले. कार्यक्रमाचे नियोजन सरिता अहिरे यांनी केली. या कार्यक्रमासाठी शाळेत शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.