प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये बक्षीस वितरण सोहळा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे आज, दि. 7 मार्च 2025 रोजी बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्राचार्य अनिता पाटील, समन्वयक राहुल पाटील तसेच शाळेच्या शिक्षिका यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. हा सोहळा म्हणजे विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कामाची पावती. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व ईशस्तवनाने झाली. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रसंगी, विद्यार्थ्यांचे कौतुक टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. विविध प्रकारचे खेळ घेण्यात येतात. या शाळेच्या शिक्षिकांचे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभते. विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. तसेच प्रचिती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवले. त्यासाठी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन व कौतुक विद्यार्थ्यांना लाभले. शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्यातही विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला व त्यातही बक्षीस पटकावले. बक्षीस वितरण सोहळा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा आवडता कार्यक्रम असून ते त्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत असते, असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वाघ यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकार्य लाभले.