प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे “ग्रॅज्युएशन डे” साजरा
पिंपळनेर :- येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी, दि. 12 मार्च रोजी “ग्रॅज्युएशन डे” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. तसेच शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील, प्रमुख अतिथी चंद्रकला शिंदे, सरस्वती बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता प्रतिमा पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. “पदवीप्रदान दिवस” विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. या दिवशी विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करतात आणि त्यांना त्यांची पदवी किंवा प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
प्रसंगी, सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी नर्सरी ते सिनियर केजी पर्यंत शिक्षण पूर्ण करून प्राथमिक शिक्षणात प्रवेश केल्यामुळे त्यांना पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. शाळेचे समन्वयक राहुल पाटील यांनी ग्रॅज्युएशन डे निमित्त माहिती दिली. तसेच, प्राचार्य अनिता पाटील यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली.
पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले. नृत्य दिग्दर्शन नेहा रोकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजन सुनीता जाधव यांनी केले. सुंदर असे फलक लेखन रिनल सोनवणे यांनी केले. सजावट किरण देवरे, सरिता अहिरे, मयुरी सोनार, अर्चना देसले यांनी केले. अश्विनी पगार, कल्याणी काकुस्ते, वैशाली वाघ, जागृती बिरारीस यांनी सेल्फी पॉइंट तयार केले. तसेच छायाचित्र योजना अकलाडे यांनी केले. चित्रफित काजल राजपूत यांनी केले. अनिता पवार यांनी सूत्रसंचालन केले.