साक्री येथे प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) आयोजित नवचैतन्य अभियानाचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ
साक्री: – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित), प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कावठे यांच्या संयुक्त विद्यमाने “नवचैतन्य अभियान” कार्यक्रमाचे भव्य आयोजन सोमवार, 24 मार्च रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गुरुपुत्र आबासाहेब मोरे होते. यावेळी, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, महंत गणेशनाथ महाराज -(विजापूर), महंत प्रणवगिरी महाराज-(नागाई), महंत योगाचार्य दिनानाथ महाराज शिव गोरक्षमंदिर- (कळंभिर), महंत रामजी महाराज-(नवडणे), महंत गणू महाराज- (म्हसदी) या सर्व मान्यवरांचे विटाई, प्रतापपूर, कासारे, मालपूर, वर्धाने, म्हसदी येथील भजनी मंडळांद्वारे ज्ञानोबा माऊली तुकाराम….. ज्ञानोबा माऊली तुकाराम…..तुकाराम तुकाराम…. या भक्ती गजरात व लेझीम नृत्यात स्वागत करण्यात आले.

शाळेच्या प्राचार्य-वैशाली लाडे यांनी मान्यवरांचे औक्षण केले. प्रमुख मार्गदर्शक गुरुपुत्र आबासाहेब मोरे, शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेचे प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे आणि कार्यक्रमाचे संयोजक स्मिता नेरकर, गणेश नांद्रे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, श्री स्वामी समर्थ महाराज, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच, शाल, श्रीफळ, पुष्प व छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची संयुक्तमूर्ती भेट देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
निधी पंजाबी, सृष्टी चव्हाण, हेताक्षी अहिरे या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु…दिगंबरा दिगंबरा…. राम आयेंगे आयेंगे या रिमिक्स भक्ती गीतांवर सुंदर असे नृत्य सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

त्यानंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी पालकांना संबोधित करताना सांगितले की, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास शिक्षणाद्वारे केला जात असतो. यात शिक्षकांच्या ज्ञानदानाबरोबर पालकांचे सहकार्य देखील महत्त्वाचे ठरलेले आहे. या शाळेला सलग पाच वर्ष धुळे जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्थेचा पुरस्कार हा शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते मिळत राहिला. परंतु, या २०२५ यावर्षीचा आदर्श शिक्षण संस्थेचा पुरस्कार, शाळेच्या गुणवत्तेवर लक्ष साधन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला आदर्श पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित करण्यात आल्याचे सांगितले. धुळे जिल्ह्यातील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला आदर्श शिक्षण संस्थेचा पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांना मिळाल्याबद्दल कार्यक्रमाचे मार्गदर्शक आबासाहेब मोरे व प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरांचा शाल, श्रीफळ, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर, गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी नवचैतन्य अभियान विद्या आणि सर्व सिद्धी या प्रमुख विषयाद्वारे विद्यार्थी- पालक यांना मार्गदर्शन, कृषी व पर्यावरण, विवाहपूर्व समस्या, बेरोजगारांना रोजगार आणि आरोग्यविषयक या काही महत्त्वाच्या विषयांवरती मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना सांगितले की, मानवी जीवनातील अडचणी दूर करून सुख-समृद्धी कशी मिळवायची, यासाठी आपण जीवनात अध्यात्म मार्गाचा अवलंब करावा असे सांगितले. कृषी व पर्यावरण विषयक मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय शेती वरती आपण भर दिला पाहिजे, भरघोस उत्पन्न काढून शेतकरी आत्महत्या आपण टाळली पाहिजे, असे मार्गदर्शन केले. विवाहपूर्व समस्या या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, मुलींचे योग्य वय पाहूनच मुलींचे विवाह केले पाहिजेत. स्त्रीचा आदर समाजात कसा राखता येईल याची भूमिका आपण निभावली पाहिजे. तिचं रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शनातून त्यांनी लोकांना प्रबोधन केले. पालक-विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, बालपणापासून संस्कार विद्यार्थ्यांवर घडवले गेले पाहिजेत आणि असे संस्कार घडवणारी शाळा म्हणजे प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आहे. विद्यार्थी हे या देशाचे आधारस्तंभ आहेत. आणि त्यांना संस्कार शील घडवण्याचे कार्य प्रचिती इंटरनॅशनल स्कूल ही दरवर्षी करत असते. तर विद्यार्थ्यांना आपण नक्कीच या प्रचिती इंटरनॅशनल स्कूल सारख्या शाळेत शिकवले पाहिजे. शिक्षणाची संधी आपण त्यांना दिली पाहिजे, असे देखील मार्गदर्शन त्यांनी केले. विद्यार्थी-पालक, कृषी व पर्यावरण, विवाहपूर्व समस्या या महत्त्वाच्या विषयांवरती मार्गदर्शन करत काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा देण्यात आल्या. या कार्यक्रमात हजारो पालक- विद्यार्थी, भक्तगण, नवतरुण- तरुणी, यांनी उपस्थिती दर्शवली होती. शेवटी गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनानंतर या सर्व उपस्थितींना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात राजे छत्रपती भजनी मंडळ-म्हसदी, माऊली भजनी मंडळ-धमनार, गोपाल कृष्ण भजनी-प्रतापपूर मंडळ,दादाजी भजनी मंडळ- कासारे, गुरुदत्त भजनी मंडळ- वर्धाने, विठ्ठल भजनी मंडळ, विटाई यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमात रांगोळी, फलक लेखन व इतर सजावट शाळेचे कलाशिक्षक-मनोज भिल, जितेंद्र कासार, दीपमाला अहिरराव, सविता लाडे, वैष्णवी देवरे, जागृती जाधव यांनी केले. विद्यार्थी लेझीम नृत्याचे संयोजन- गीतांजली काकुस्ते व भक्तीगीत नृत्याचे संयोजन सपना ठाकरे, पुनम पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता नेरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन स्मिता नेरकर, गणेश नांद्रे यांनी केले. सर्व शिक्षक- शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने “नवचैतन्य अभियान विषयक” कार्यक्रम मोठ्या भव्य-दिव्यपणे गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने उत्साहात आणि आनंदात पार पडला.




















