
ठळक बातमी : साक्री व कासारे येथे प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या नवीन शाखांचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगाचार्य पंडित जी दिनानाथ जी महाराज यांची उपस्थिती लाभली. तसेच शाळेचे संस्थापक आदरणीय श्री प्रशांत भीमराव पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच समन्वयक श्री तुषार देवरे व श्री वैभव सोनवणे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे संयोजन सौ. कांचन अहिरराव व सौ. हेमांगी बोरसे यांनी केले असून त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. या मंगल प्रसंगी शाळेचा सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ड्रायव्हर बंधू तसेच मावशी यांचीही उपस्थिती लाभली. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अतिशय सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडला.















