साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंची विभागस्तरीय तेंग-सु-डो क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. धुळे जिल्हा शालेय तेंग-सु-डो क्रीडा स्पर्धा २०१९-२० रविवार दि.२९ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडल्या. यामध्ये, १७ वर्ष वयोगटात मुली – शुभदा अरुण बच्छाव, १९ वर्ष वयोगट मुली – गायत्री अंकुश साळुंके यांची विभाग स्तरावर तेंग-सु-डो स्पर्धेसाठी निवड झाली. धुळे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये, मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे शाळेचे अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे, क्रीडा शिक्षक नितीन राजपूत यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.