अण्णा बनसोडे यांच्याकडून अभिवचन

पिंपरी :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहिर केला आहे. पत्रकार परिषदेत मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी याबाबतची घोषणा केली व पाठिंब्याचे पत्रही दिले. दरम्यान, बनसोडे यांनी मनसेचे या पाठिंब्याबद्दल आभार मानले. मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.

     आकुर्डी येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पिंपरी मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी महापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, नगरसेविका निकिता कदम, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, राजू सावळे, विशाल मानकरी, विभाग अध्यक्ष अंकुश तापकीर, दत्ता देवतरसे, सचिव रुपेश पटेकर, राहुल जाधव, शहर संघटक विष्णू चावरिया, विद्यार्थी सेना शहर प्रमुश हेमंत डांगे, महिला संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी बांगर, संगीता देशमुख, सिमा बेलापुरकर, मिनाताई गटकळ, आदिती चावरिया आदी उपस्थित होते.

     याबाबत भूमिका स्पष्ट करताना मनसेचे नेते बाबू वागस्कर म्हणाले की, देशात व राज्यात भाजपच्या विरोधात मनसेने भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणूकीत ही पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेतल्या होत्या. या निवडणूकीत जेथे मनसेचा उमेदवार नाही तेथे भाजप विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्याला अनूसरूनच पिंपरी मतदार संघात आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहिर करण्यात येत आहे.

     शहराच्या सर्वांगिण विकासासाठी व लोकहितासाठी मनसेने अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिल्याचे मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी मनसेचे पाठिंब्याबद्दल आभार मानले. मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीकडून सन्मान राखला जाईल. राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणेत मनसेचा झेंडा असेल, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटोहि वापरला जाईल. भविष्यातहि मनसे कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला आपण निश्चत मदत करु, असे अभिवचन अण्णा बनसोडे यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here