पिंपरी :- पिंपरी विधानसभा मतदार संघातील पिंपरी कॅम्पात राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आज सोमवारी (दि. 21) सकाळपासूनच त्यांच्या घरासमोर पंधरा ते वीस तरुणांचे टोळके फिरत होते. मतदान असल्याने स्लिपा वाटप करताना या हल्लोखारांनी कार्यकर्त्यांवर, भावावर आणि माझ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला असल्याचा आरोप आसवानी यांनी केला आहे.
दरम्यान एका जखमी तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचे नाव उमर कुमार सिंग असे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये आजुबाजुच्या व्यक्तींकडून हा प्रकार कोणी केला याची विचारणा केली जात आहे. मध्येच वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींची नावे घेतली जात आहेत. वास्तवीक राजकीय असंतोषातूनच हा प्रकार घडल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. हल्लोखारांपैकी चार जणांनी पिस्तूल दाखवून धमकावले. दरम्यान, आसावानी यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांना जशासतसे प्रत्युत्तर दिल्याने हल्लोखोर पसार झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी आसवानी यांच्या घरासमोर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.






















