भोसरी – भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे 77 हजार 577 मतांनी विजयी झाले. आमदार महेश लांडगे यांनी पहिल्या फेरीपासून मताधिक्याचा आलेख चढताच ठेवला. महेश लांडगे यांना 1 लाख 59 हजार 305 तर विलास लांडे यांना 81 हजार 728 मते मिळाली. विलास लांडे यांना मिळालेल्या मतांएवढे मताधिक्य महेश लांडगे यांना मिळाले. 77 हजार 577 एवढे लांडगे यांना मताधिक्य मिळाले.
भोसरी विधानसभा मतमोजणीच्या एकूण 22 फेऱ्या झाल्या. बावीसाव्या फेरीअंती महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांना 1 लाख 59 हजार 20 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना 81 हजार 543 मते मिळाली. पोस्टल मतदानात महेश लांडगे यांना 285 तर विलास लांडे यांना 185 मते मिळाली. प्रत्येक फेरीत महेश लांडगे आघाडीवर राहिले.
सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी 12 वाजल्यापासून जल्लोषाला सुरुवात केली. भंडा-याची मुक्त उधळण करत विजयाचा जल्लोष करण्यात आला. श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलाच्या बाहेर आमदार महेश लांडगे येताच तिथे थांबलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जयघोष केला. त्यावेळी पैलवान असलेल्या लांडगे यांनी शड्डू ठोकून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
फेरीनिहाय मताधिक्य (कंसात मताधिक्य) –
पहिली फेरी:
महेश लांडगे – 8 हजार 481 (4 हजार 387)
विलास लांडे – 4 हजार 94
दुसरी फेरी:
महेश लांडगे – 17 हजार 953 (10 हजार 18)
विलास लांडे – 7 हजार 971
तिसरी फेरी:
महेश लांडगे – 25 हजार 496 (12 हजार 719)
विलास लांडे – 12 हजार 777
चौथी फेरी :
महेश लांडगे – 32 हजार 286 (14 हजार 704)
विलास लांडे – 17 हजार 582
पाचवी फेरी:
महेश लांडगे – 39 हजार 106 (17 हजार 325)
विलास लांडे – 21 हजार 781
सहावी फेरी:
महेश लांडगे – 46 हजार 851 (25 हजार 472)
विलास लांडे – 25 हजार 472
सातवी फेरी:
महेश लांडगे – 55 हजार 970 (26 हजार 215)
विलास लांडे – 29 हजार 755
आठवी फेरी:
महेश लांडगे – 64 हजार 535 (30 हजार 744)
विलास लांडे – 33 हजार 791
नववी फेरी:
महेश लांडगे – 69 हजार 873 (32 हजार 508)
विलास लांडे – 37 हजार 365
दहावी फेरी:
महेश लांडगे – 76 हजार 9 (35 हजार 054)
विलास लांडे – 40 हजार 955
अकरावी फेरी:
महेश लांडगे – 84 हजार 95 (39 हजार 470)
विलास लांडे – 44 हजार 625
बारावी फेरी :
महेश लांडगे – 92 हजार 261 (43 हजार 585)
विलास लांडे – 48 हजार 676
तेरावी फेरी:
महेश लांडगे – 97 हजार 939 (45 हजार 195)
विलास लांडे – 52 हजार 744
चौदावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 6 हजार 126 (48 हजार 577)
विलास लांडे – 57 हजार 549
पंधरावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 16 हजार 311 (55 हजार 227)
विलास लांडे – 61 हजार 34
सोळावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 23 हजार 822 (59 हजार 750)
विलास लांडे – 64 हजार 72
सतरावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 28 हजार 246 (60 हजार 361)
विलास लांडे – 67 हजार 859
अठरावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 35 हजार 966 (64 हजार 862)
विलास लांडे – 71 हजार 104
एकोणीसावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 44 हजार 344 (68 हजार 936)
विलास लांडे – 75 हजार 408
विसावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 53 हजार 38 (73 हजार 608)
विलास लांडे – 79 हजार 430
एकविसावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 58 हजार 623 (77 हजार 279)
विलास लांडे – 81 हजार 344
बावीसावी फेरी :
महेश लांडगे – 1 लाख 59 हजार 20 (77 हजार 477)
विलास लांडे – 81 हजार 543
टपाली मतदान :
महेश लांडगे – 285
विलास लांडे – 185
उमेदवारांना मिळालेली मते –
महेश लांडगे (भाजप) – 1 लाख 59 हजार 305
विलास लांडे (अपक्ष) – 81 हजार 543
शाहनवाज शेख (वंचित बहुजन आघाडी) – 13 हजार 151
राजेंद्र पवार (बहुजन समाज पार्टी) – 1 हजार 859
विश्वास गजरमल (जनहित लोकशाही पार्टी) – 706
वहिदा शेख (समाजवादी पार्टी) – 611
ज्ञानेश्वर बोराटे (अपक्ष) – 604
छाया जगदाळे-सोळंके (अपक्ष) – 501
मारुती पवार (अपक्ष) – 384
भाऊसाहेब आडागळे (अपक्ष) – 300
हरेश डोळस (अपक्ष) – 243
‘नोटा’ – 3 हजार 630






















