पिंपरी : नवरात्रीचे औचित्य साधून महिलांवर होणार्या अत्याचारविरुद्ध लढणार्या प्रख्यात सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या जीवनावर व आंदोलनावर आधारित ताईगिरी या चित्रपटाचा शुभमुहूर्त महालक्ष्मी मंदिर पुणे येथे करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिला सभासद तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट संघाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नॅशनल इंटिग्रेशन अवॉर्ड, स्टेज अवॉर्ड आणि अनेक प्रतिष्ठित पारितोषिक विजेते सुप्रसिद्द सिनेदिग्दर्शक दीपक बलराज विज यांच्या ’सैलाब’ (माधुरी दीक्षित), ’जान तेरे नाम’ सारखे सुपरहिट सिनेमे आणि ’हप्ताबंद’, ’बॉम्बब्लास्ट’, ’कहा है कानून’ सारखे सुपरहिट वास्तविक, अॅक्शन हिंदी चित्रपटानंतर मराठीत गाजलेले ’मोहित्यांची रेणुका’, ’ऐका दाजीबा’ आता ताईगिरी बस झाली आता दादागिरी, भाईगिरी आता फक्त ताईगिरी या टॅगलाईनने हा चित्रपट घेऊन येत आहेत.
भूमाता बिग्रेड नामक संघटनेच्या संस्थापक प्रमुख असलेल्या तृप्ती देसाई यांची कार्यप्रणाली उल्लेखनीय आहे. महिलांवर होणारा अत्याचार असो किंवा स्त्रीभ्रुण हत्या असो अत्याचाराविरूद्ध आवाज उठविणार्या एकमेव कार्यकर्त्या म्हणजे तृप्ती देसाई. शनिशिंगणापूर येथील शनी चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्यापासून ते त्यांच्या संरक्षणापर्यंत संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलून तृप्ती देसाई या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
यावेळी किशोरी शहाणे म्हणाल्या की, दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार वाढत आहेत. असे असताना तृप्ती देसाई सारखी स्त्री कोणत्याही पाठींब्याविना उभी राहते आणि अत्याचाराविरोधात लढते. हा लढा समाजापर्यंत पोहचावा, यासाठी हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. चित्रपट मराठी असला तरी तो इतर सर्व भाषांमध्ये डब करून जगभरातील महोत्सवामध्ये दाखवला जाईल. असेही त्या म्हणाल्या.
तृप्ती देसाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
