पिंपरी | ज्यांच्या मालकीची जनावरे आहेत. त्यांनी आपली जनावरे बंदीस्त ठेवावीत. त्यांना सार्वजनिक जागेवर सोडू नये, असे आवाहन पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम आखण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील गाय, म्हैस, घोडा, गाढव आदी मोकाट जनावरे ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने मोहीम आखली आहे. ही जनावरे सार्वजनिक रस्त्यावरून जातात किंवा त्याठिकाणी ठिय्या मांडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. जुना पुणे-मुंबई महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक ठप्प होताना दिसत आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्या व्यक्तींची जनावरे आहेत. त्यांनी आपली जनावरे बंदीस्त ठेवावीत. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागने केले आहे.