पिंपरी चिंचवड शहरात राहणार्या सर्वच समाजाचा मी घटक ः आमदार महेश लांडगे
पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवडला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. याठिकाणी राहणार्या सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली आहे. शहरात राहणार्या प्रत्येक समाजाचा मी घटक असून याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन भोसरी विधानसभेचे आमदार तथा पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी केले. चर्होलीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात रविवार दि. 26 जानेवारी रोजी बारी समाज विकास मंचचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी, प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेश लांडगे बोलत होते. यावेळी, व्यासपीठावर मनोहर लोढे, ओंकार काटोले, संजय बारी, सुमतीताई बारी, शोभा केदार, विनायक भोंगाळे, कविताताई भोंगाळे, कडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे पुढे म्हणाले, मी ज्या शहराचे नेतृत्व करतोय त्या शहरातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज समाधानी असला पाहिजे, अशा विचारांचा मी आहे. त्यामुळे जात पात न बघता तुमचा प्रतिनिधी म्हणून मी काम करीत आहे. त्यामुळे शहरात वावरतांना कुठलीही चिंता, अथवा भय मनात धरू नका. काही अडचणी असल्यास संपर्क साधा, तुमचे कामे त्वरित मार्गी लावले जातील, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. बारी समाज हा शेतकरी आणि कष्टाळू समाज आहे. या समाजाची मोठी संख्या शहरात वास्तवास असून मला नेतृत्वाची संधी दिल्याबद्दल आभारी असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार कोटोले यांनी केले. दरम्यान, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्ती तसेच महिलांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. तसेच, खेळ रंगला पैठणीचा या खेळातून सूत्रसंचालक भरत बारी यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. या खेळातील तीन विजेत्या कविता ढगे, जयश्री चौधरी, शोभा केदार या महिलांना पैठणी देवून गौरविण्यात आले. आभार ओंकार काटोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. अतुल कोल्हे, राजेंद्र काळपांडे, संतोष ढगे, सुरेश अस्वार, विठ्ठल ढगे, शेषराव नानकडे, मनोहर पवार, विठ्ठल कपले, समाधान कपोते, दिनेश रौंदळ, नितीन मिसाळ, योगेश ढगे, महादेव केदार, अरविंद हागे, विजय कोथळकर, मंगेश थोरात, आतिष ढगे, विवेक काटोले, आनंद दामधर, डॉ. अरुण अंबडकर, अशोक बोडखे, रामदास अंबडकर, डॉ. गौरव राऊत यांनी परिश्रम घेतले.