Chaupher News
अनेकवेळा ‘ध’ चा ‘मा’ केला जातो, असे इतिहासच सांगतो. मी तर आता काहीही बोलण्याच्या आधी पन्नासवेळा विचार करतो. सर्व गोष्टी तोलून मापून बोलाव्या लागतात. ज्यातून गैरसमज निर्माण होईल, शंका-कुशंकेला वाव मिळेल, अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत, अशी अपेक्षा आपण सहकाऱ्यांकडून देखील व्यक्त करतो, असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बेधडक बोलण्याची शैली राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. अजित पवारांच्या याच बोलण्याच्या स्टाईलचे अनेक चाहतेही आहेत. पण, याच शैलीमुळे अजित पवारांच्या राजकीय जीवनात वादही निर्माण झाले. त्यानंतर अजित पवार तोलूनमोपून बोलताना दिसतात. अमरावतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी याला पुष्टीच दिली.
अजित पवार मंगळवारी अमरावतीत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारमधून बाहेर पडण्याविषयी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी त्यांची भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले, “बहुतांश वेळा ‘ध’ चा ‘मा’ केला जातो. इतिहासच असं सांगतो. आता तर मी काहीही बोलण्याच्या आधी पन्नासवेळा विचार करतो. सर्व गोष्टी तोलून मापून बोलाव्या लागतात. ज्यातून गैरसमज निर्माण होईल. शंका-कुशंकेला वाव मिळेल, अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत, अशी अपेक्षा आपण सहकाऱ्यांकडून देखील व्यक्त करतो,” असं ते म्हणाले.