Chaupher News
परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी दिला. पण, यावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धनजंय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. बीडच्या पालकमंत्र्यांकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली केल्याची टीका पंकजा यांनी ट्विटरून केली आहे.
परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफियाराज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण ..गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव..हे खपवून घेतलं जाणार नाही. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली..सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे असल्याचे त्या म्हणाल्या.