चौफेर न्यूज –: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने फेबुवारी-मार्च २०२० ला घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे बारावीच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्या, गुरुवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com , www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
या संकेतस्थळावर विद्यार्थी बारावीच्या सर्व विषयांमध्ये किती गुण मिळाले आहेत हे पाहू शकणार आहेत. शिवाय या निकालाची प्रिंटही ते काढू शकतात.