चौफेर न्यूज – कोविड नंतर पुणे शहरात हळूहळू 9 ते 12 शाळा व कॉलेज सुरु होत आहेत. या मध्ये पुणे मनपा च्या सर्व 44 शाळा तथा खासगी विभागातील 235 शाळा आज पर्यंत सुरु झाल्या आहेत. अशी माहिती पुणे मनपा चे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी दिली.
अधिक माहिती देताना अतिरिक्त आयुक्त म्हणाले कि पुणे शहरात खासगी 529 शाळा आहेत. त्यातील 235 शाळा सुरु झाल्या आहेत. हळूहळू अन्य शाळा ही सुरु होतील.

मात्र पुणे महानगरपालिकेच्या सर्व 44 शाळा सुरू झाल्या. आहेत. या मध्ये सध्या 50% विद्यार्थी उपस्थित रहात आहे. शाळेच्या जवळील विद्यार्थी सध्या येत आहेत. बरेच विद्यार्थी लांब रहात असल्याने त्यांना शाळेत सोडण्याचा प्रश्न पालक वर्गा समोर आहे. त्यामुळे सध्या शाळांन मध्ये उपस्थिती कमी आहे.

मनपा शाळेतील सर्व शिक्षकांची कोरोना टेस्ट (आरटीपीसी)झाली असुन त्यातील 12-13 शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती देताना जगताप म्हणाले कि खासगी शाळेतील 50% शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी स्वतः आपल्या शाळेत कोरोना चाचणी ची व्यवस्था करुन चाचणी करुन घेतली आहे. ज्या खासगी शाळा मनपा द्वारे चाचणी करु इच्छितात त्यांना पुणे मनपा द्वारे तारखा देऊन चाचणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here