चौफेर न्यूज – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा 2021 च्या तारखांची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री निशंक यांनी वेबिनारच्या माध्यमातून आयआयटीमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पात्रता व नियमांचीही माहिती दिली. त्याची तारीख 3 जुलै 2021 रोजी निश्चित केली गेली आहे.

केंद्रीय मंत्री आपल्या भाषणात म्हणाले, ‘प्रिय विद्यार्थ्यांनो जेईई मेन्स परीक्षांच्या तारखांची घोषणा केल्यानंतर सतत आपल्या सूचना येत राहिल्या की जेईई अ‍ॅडव्हान्सची परीक्षा कधी घेतल्या जातील, कुठे होतील आणि त्यामध्ये मागच्या वेळेनुसार यावेळी देखील काही सूट मिळेल की नाही.’

निशंक पुढे म्हणाले, ‘मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की मागच्या वेळी कोविडमुळे विषम परिस्थिती होती आणि अद्याप त्यातून आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो नाही. अशा परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे की जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत 75% गुणांचा जो निकष होता त्यास यावेळी देखील हटवण्यात आले आहे जेणेकरून आपल्याला ही सुविधा मिळेल आणि हुशार विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील.’

तारखेच्या घोषणा करताना केंद्रीय शिक्षण मंत्री पुढे म्हणाले, ‘या परीक्षा जसे की आपल्याला माहीतच आहे की खूप महत्वपूर्ण असतात. 3 जुलै 2021 ही तारीख यासाठी निश्चित झाली आहे. आपल्याजवळ अजून बराच वेळ आहे, आपण चांगल्यापैकी याची तयारी करू शकता. या वेळेची परीक्षा आयटी खडगपुर आयोजित करणार आहे.’

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंबंधित एक ट्वीटही केले होते. आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी लिहिले आहे की, ‘माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, मी आज संध्याकाळी 6 वाजता जेईई अ‍ॅडव्हान्सची तारीख आणि आयआयटी प्रवेशासाठी पात्रतेच्या निकषांची घोषणा करेन.’

अधिक माहिती म्हणजे जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या माध्यमातून देशातील 23 प्रतिष्ठित आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. जेईई मेन्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्स देण्याची संधी मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here