पिवळ्या रंगात बहरली प्रचिती प्रि- प्रायमरी स्कूल; “यलो डे” उत्साहात साजरा
साक्री : येथील प्रचिती प्रि – प्रायमरी स्कूलमध्ये “येलो डे” साजरा करण्यात आला. यावेळी पिवळ्या रंगात स्कूलचा परिसर बहरून आला. प्रसंगी, कथा कथन स्पर्धा देखील घेण्यात आली. हिंदू धर्मानुसार पिवळा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. पिवळा रंग तीव्रता दर्शवित असल्याचे शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले. यावेळी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी इयत्ता नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन पिवळ्या रंगाचे फुगे, फळे, फुले, भाज्या आदी वस्तू तयार करून त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमासाठी कांचन साळुंखे यांनी कविता सादर केली. फलक लेखन शिक्षिका दीपमाला मॅडम, सविता मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी ठाकरे यांनी तर संयोजन शाळेच्या शिक्षिका प्रभावती चौधरी, हिरल सोनवणे यांनी केले. उत्साहपूर्ण वातावरणात “येलो डे” कार्यक्रम साजरा करण्यात आला.