साक्री : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने ईसीइएफ ने आयोजित धुळे जिल्हयातील “उत्कृष्ठ शाळा” म्हणून प्रचिती इंटरॅनशनल स्कूल आणि ज्यू कॉलेजला “स्टार इज्युकेशन अवॉर्ड 2023” या पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांनी मुंबई बीकेसी येथे हा पुरस्कार स्विकारला. या पुरस्कारामुळे प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या लौकिकात भर पडली असून धुळे जिल्हयातून स्कूलच्या प्रगतीबाबत कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रचिती स्कूल व त्या संलग्न असलेल्या व्यक्तींना मिळालेला १२ वा पुरस्कार आहे.
या अगोदर, नमस्कार महोत्सव पुरस्कार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.श्री.भागवत कराड यांच्या हस्ते पुणे येथे लोकमत एज्युकेशनल अवॉर्ड 2023 चा धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट स्कूल पुरस्कार, खान्देश मराठा पाटील समाजाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांचा ‘शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार देऊन सन्मान, पी.एम.आर.डी.ए.चे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांना खान्देश मराठा समाजाचा ‘खान्देश भूषण पुरस्कार’, सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या हस्ते प्रशांत पाटील यांचा ’खान्देश रत्न पुरस्कार” देवून सन्मान, सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च (सी.ई.जी.आर.) यांच्या वतीने प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शाळा या पुरस्काराने सन्मान, शालेय शिक्षणमंत्री मा.दिपक केसरकर यांच्या हस्ते बेस्ट स्कूल पुरस्कार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.उदयजी सामंत यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार, शालेय शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते बेस्ट स्कूलचा पुरस्कार, पिंपरी चिंचवड कलाकार संघ यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांचा शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मान, खान्देश मराठा यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल प्रशांत पाटील यांचा मायबोली भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. धुळे जिल्हयातील “उत्कृष्ठ शाळा” म्हणून प्रचिती इंटरॅनशनल स्कूल आणि ज्यू कॉलेजला “स्टार इज्युकेशन अवॉर्ड 2023” या पुरस्काराने गौरविण्यात आल्याने अजून एका पुरस्काराने भर घातली आहे.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानाचे बंधन नसून प्रात्यक्षिकांद्वारे त्यांच्या कौशल्यात भर घालण्याचे काम केले जाते. शाळा व्यवस्थापनाने घालून दिलेल्या नियमांचे कटेकोर पालन करून अभ्यासिका, क्रीडा, सांस्कृतिक उत्सव यासह विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष केद्रींत केले. यासाठी शिक्षक व विद्यार्थी आपली भूमिका उत्कृष्ठ पध्दतीने पार पाडत असल्याने शाळेने अनेक पुरस्कारांची गवसनी घातली आहे, अशी प्रतिक्रीया संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.