चौफेर न्यूज –  नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट वायरल होत होती, ज्यामध्ये म्हटले होते की, शिक्षण मंत्र्यांनी सीबीएसई दहावी आणि बारावी वर्गाच्या बोर्ड एग्झामसाठी पासिंग क्रायटेरिया रिवाइज केला आहे. यामुळे तमाम विद्यार्थी, जे यावर्षी परीक्षेत सहभागी होणार आहेत, ते अस्वस्थ झाले. मात्र, आता केंद्र सरकारची नोडल एजन्सी पीआयबीने या फेक इन्फॉर्मेशनचे खंडण केले आहे. पीआयबीने म्हटले आहे की, अशाप्रकारची कोणतीही घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केलेली नाही आणि याबाबत कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. पीआयबीने हे आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये म्हटले आहे की, 10वी आणि 12वी च्या बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी आता 33 टक्के ऐवजी 23 टक्के गुणांची आवश्यकता असेल. पीआयबीने यास चुकीचे ठरवले आहे.

10 वी आणि 12वी बोर्डासाठी पासिंग क्रायटेरियाबाबतची पोस्ट वायरल होत होती. पोस्ट वायरल झाल्यानंतर असंख्य विद्यार्थ्यांनी मंत्रालय आणि बोर्डाकडे संपर्क केला. यानंतर संभ्रम दूर करण्यासाठी पीआयबीने ही पोस्ट केली. दरम्यान, सीबीएसई इंग्लिश आणि संस्कृत भाषेचे पेपर दोन स्तरावर आणणार आहे. आतापर्यंत गणित आणि हिंदी दोन स्तरावर येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये स्ट्रेस लेव्हल कमी करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here