चौफेर न्यूज – दिनांक 26/01/2021रोजी प्रचिती पब्लिक स्कूल येथे “प्रजासत्ताक दिन साजरा”
“स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,
सूर्य तळपतो प्रगतीचा
भारत भूमीच्या पराक्रमाला
मुजरा महाराष्ट्रचा ….
आजच्या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक श्री .राहुल पाटील सर उपस्थित होते. 72 व्या प्रजासत्ताक दिनी श्री राहुल पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी रांगोळी व फलक लेखन करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ‘विजयी विषव तिरंगा प्यारा’ असे मंगलमय ध्वजगीत गाण्यांत आले. व “भारताचे संविधान उद्देशिका” म्हणण्यात आली.
“उत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला”
आशा वीर जवानांना मानवंदना देऊन भारत माता की जय, वंदे मातरम आशा घोषणा देण्यात आल्या व शेवटी कार्यक्रमाची सांगता ” जय हिंद जय भारत” म्हणून करण्यात आली.