पिंपरीगावातील प्रसिध्द उद्योजक संदीप वाघेरे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पिंपरीगावात भाजपाला फायदा होणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते.
संदीप वाघेरे यांनी 2012 ची महापालिका निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढवली होती. त्यावेळी मतदारांनी त्यांना दुस-या क्रमांकाची पसंती दिली. आगामी महापालिका निवडणूक चार सदस्यीय पॅनल पध्दतीने होणार आहे. त्यामुळे प्रभाग मोठे झाले असून मतदारसंख्या वाढली आहे.
तसेच संदीप वाघेरे यांचा प्रभाग सिंधी बांधव रहिवाशी असलेल्या भागाला जोडला गेला असून सिंधी बांधवांची मते भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता असल्याने वाघेरे यांना निवडणुकीत याचा फायदा होवू शकतो. दरम्यान, वाघेरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे – पाटील, उपमहापौर प्रभाकर वाघेरे आणि स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी यांच्या समोर आव्हान निर्माण झाले आहे.
उद्योजक संदीप वाघेरे यांचा भाजपात प्रवेश





















