चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅम व सौ.भारती पंजाबी
मॅम उपप्राचार्या सौ.वैशाली खैरनार मॅम व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर व श्री.तुषार देवरे सर यांच्या हस्ते डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या प्रसंगी श्री.रावसाहेब सावळे सरांनी विज्ञान दिनाचे महत्व विषद केले. तसेच श्री.मोहन गावित सरांनी डॉ.सी.व्ही.रमण यांचा जीवन परिचय व त्यांच्या कार्याविषयी माहिती विशद केली.कार्यक्रमाचे संयोजन सौ.स्मिता नेरकर मॅम यांनी केले व सुंदर फलक लेखन श्री.रावसाहेब सावळे सर व वैष्णवी थोरात मॅम यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.