चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅम व सौ.भारती पंजाबी मॅम उपप्राचार्या सौ.वैशाली खैरनार मॅम व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर व श्री.तुषार देवरे सर यांच्या हस्ते विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि.वा.
शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने हा दिन साजरा केला जातो.मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले व मराठी ही भारतातील तिसरी व जगातील पंधरावी भाषा आहे.मराठी भाषेची निर्मीती संस्कृत पासून झाली.
तसेच “कना” ही कविता श्री.कुणाल देवरे सरांनी सादर केली.”ध्यास मराठी महाराष्ट्राचा” ही कविता श्री.संदीप देवरे सरांनी सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कुणाल देवरे यांनी केले.कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन वैष्णवी थोरात मॅम व वृषाली सोनवणे मॅम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.