चौफेर न्यूज – राष्ट्रीय परीक्षा मंडळाने एनईईटी 2021 पीजी परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे उमेदवारांवर याचा काय परिणाम होणार आहे ? आणि काय होईल ? याकडे लक्ष लागले आहे. या अधिसूचनेनुसार पदव्युत्तर पदवी 2021 साठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश चाचणीसाठी 23 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अद्याप अर्ज केलेले नसलेले आणि अर्ज करणारे उमेदवार 15 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एनईईटी (नीट) पीजी 2021 परीक्षेसाठी उमेदवार एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात. या वेळी एनईईटी पीजी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठ्या बदलांमुळे उमेदवारांवर दबाव पडला आहे. कारण असे म्हटले जात आहे की, या वेळी प्रश्नपत्रिका मागील वेळेपेक्षा जास्त वेगळ्या असू शकते. तथापि, सिलॅबसमध्ये अद्याप जे आहे त्याऐवजी इतर बाबी येतील, असा अंदाज आहे. यामुळे उमेदवारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

अर्ज शुल्कामध्ये वाढ : राष्ट्रीय परीक्षा मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या वेळी सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज फी 3750 रुपयांवरून 5015 रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर एससी / एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांचे शुल्क 2750 रुपयांवरून 3835 रुपये इतके केले आहे.

परीक्षा केंद्र : एनईईटी (नीट) पीजी 2021 परीक्षेचे परीक्षा केंद्र 165 वरून 255 करण्यात आले आहे.

परीक्षा नमुना : जारी केलेल्या सूचनेनुसार, या वेळी एनईईटी पीजी 2021 परीक्षेत विचारले जाणार्‍या प्रश्नांची संख्या आणि त्यांचे गुणही कमी करण्यात आले आहेत. यावेळी एकूण 200 एमसीक्यू असतील आणि त्यांचे गुण 1200 वरून 800 पर्यंत कमी करण्यात आले आहेत. परीक्षेचे वेळापत्रक बदलत आता ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. यापूर्वी ही परीक्षा सायंकाळी 3 ते 7 या वेळेत घेण्यात आली.

एनईईटी (नीट) पीजी प्रवेश परीक्षेद्वारे 6102 शासकीय, खासगी, डीम्ड विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांना 10,821 मास्टर ऑफ सर्जरी (एमएस), 19583 डॉक्टर ऑफ मेडिसीन (एमडी) आणि 6102 पीजी डिप्लोमा जागा देण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here