चौफेर न्यूज – एमबीबीएसची अंतिम वर्षांची परीक्षा अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने ऑफलाईन घेतली जाणार असल्याचे वृत्त आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे 8 मार्चपासून सुरु होणारी एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती.

परंतु राज्यातील अनेक केंद्र, महाविद्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. या व पुढील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना कोरोना झाला किंवा कोरोनाची लक्षण दिसतील. त्यांच्यासाठी आयसोलेशन रूमची वेगळी व्यवस्था प्रत्येक परीक्षा केंद्रावर केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here