चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅडम,सौ.भारती पंजाबी मॅडम,उपप्राचार्या सौ.स्मिता नेरकर मॅडम व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता,जिजामाता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी इयत्ता पाचवी ते इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले,मदर टेरेसा,जिजाबाई,कल्पना चावला,झाशीची राणी,हिमादास,प्रतिभाताई पाटील,सानिया नेहवाल,३० प्रेरणादायी महिलांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली.तसेच इयत्ता नववीतील पल्लवी वाघ हिने भारतातील महिला दया,ममता,स्नेह,मधुरता आणि पूर्ण विश्वास युक्त आहे.त्यांचे हृदय सुंदर गुणांचा खजिना आहे.महिलांना जीवन जगतांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे. असे विचार व्यक्त केले.महिला ही सहयोगीनी,जीवन संगिनी व सह धर्मीनी आहे.माता,मुलगी,सून असे सर्वा नाते पूर्णपणे पार पडते व स्वतः आपल्या कर्माने स्वतःचा सन्मान करत प्राप्त करते असे मत निकिता जाधव इयत्ता दहावी हिने व्यक्त केले.तर आजची स्त्री कुशल वायुयान चालिका,सैनिक,वक्ता,प्रवक्ता आणि व्यवसायिका म्हणून प्रसिद्ध आहे.असे मत ऋत्विजा खैरनार इयत्ता दहावी हिने व्यक्त केले.इयत्ता सहावीतील कुमुद भामरे,इ.पाचवीतील लोकेश भदाणे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅम यांनी महिला दिनानिमित्त माहिती विशद केली.तर सौ.भारती पंजाबी मॅडम यांनी महिलांचा गौरव व्यक्त करणारी कविता आपल्या भाषणातून व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे संयोजन सौ.पुनम पवार मॅडम यांनी केले.सूत्रसंचालन श्री.मोहन गावित सर यांनी केले. फलकलेखन श्री.रावसाहेब सावळे सर व सौ.सुनिता पाटील मॅडम यांनी केले. सुंदर रांगोळीचे रेखाटन सौ.वृषाली सोनवणे मॅम व वैष्णवी थोरात मॅडम यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.