चौफेर न्यूज – राज्‍यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना विविध परीक्षा यामुळे प्रभावित होत आहेत. नुकतीच एमपीएससीपाठोपाठ दहावी-बारावीच्‍या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्‍या आहेत. यातून आता नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्‍स परीक्षेवरही कोरोनाचे सावट आहे. येत्‍या २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान परीक्षा घेण्याचे नियोजित असून, कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे व लॉकडाउन जाहीर झाल्‍यास अशा परिस्‍थितीत विद्यार्थी परीक्षा देणार कशी, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.

‘एनटीए’तर्फे शैक्षणिक वर्षात दोनवेळा ही परीक्षा घेतली जात असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्‍या चार संधी उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. त्‍यानुसार फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या परीक्षा पार पडल्या आहेत, तर एप्रिल व मेमध्ये उर्वरित दोन प्रयत्‍न विद्यार्थ्यांना देता येणार आहेत. सध्याच्‍या परीस्‍थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परिस्‍थिती चिंताजनक आहे. अशा परिस्‍थितीत विविध परीक्षा स्‍थगित केल्‍या जात आहेत. अशातच येत्‍या २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान नियोजित असलेल्‍या जेईई मेन्‍स परीक्षेवरही कोरोनाचे सावट असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here