चौफेर न्यूज – कोरोनामुळे निर्माण झालेल्या सद्य:स्थितीचा विचार करून सीआयएससीईने दहावी-बारावीच्या २०२१मध्ये होणाऱ्या परीक्षांना तूर्तास स्थगिती दिली आहे. या परीक्षा ४ मेपासून सुरू होणार होत्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा न देण्याचा पर्याय निवडल्यास अशा विद्यार्थ्यांचा योग्य आणि नि:पक्षपातीपणे निकाल देण्यासाठी ‘सीआयएससीई’तर्फे निकष विकसित करण्यात येतील, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या बोर्डाच्या परीक्षांबाबत अंतिम निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घेण्यात येणार आहे, अशी माहिती ‘सीआयएससीई’च्या वतीने देण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या पुढील तारखा कळविण्यात येतील.

तर दहावीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांसह ऑफलाइन परीक्षा देण्याचा किंवा ऑफलाइन परीक्षा न देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here