चौफेर न्यूज – देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. 10 वी च्या परीक्षा देखील केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (CBSE) रद्द केल्या होत्या. पण विद्यार्थ्यांना मार्क कसे द्यायचे याबाबत बोर्डाने अंक नीतीची घोषणा केली आहे. सीबीएसईने म्हटलं की, प्रत्येक विषयात 20 मार्क अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे देण्यात येणार आहे. तर 80 मार्क हे सत्र परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे दिले जाणार आहेत.

सीबीएसई बोर्डाचा निकाल 20 जून रोजी जाहीर केला जाणार आहे.

20+80 चा फॉर्मूला

सीबीएसईने म्हटलं की, प्रत्येक विषयासाठी 100 गुणांचं मुल्यांकन केलं जाईल. यामध्ये 20 गुण हे इंटरनल असेसमेंटनुसार तक 80 गुण नव्या पॉलिसीनुसार दिले जातील.

वेळेनुसार परीक्षण (Periodic Test) किंवा यूनिट टेस्ट – 10 गुण
(Half Yearly/ Mid-term) मध्यावधी परीक्षा – 30 गुण
प्री-बोर्ड परीक्षा – 40 गुण

जे विद्यार्थी इंटरनल असेसमेंट प्रोसेसमध्ये मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील तर त्यांना परीक्षा देता येईल. सीबीएसई दहावीच्या परीक्षा कोविड-19 संक्रमणाच्या परिस्थितीनुसार कधी घ्यायची ते ठरवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here