चौफेर न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन सत्र परीक्षेत जवळपास 350 विद्यार्थी गैरपक्रार करताना आढळून आले. यावेळी ‘स्क्रीनशॉट’ काढून परीक्षा देताना 350 पेक्षा अधिक विद्यार्थी निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

विद्यापीठामार्फत बहुपर्यायी (एमसीक्‍यू) स्वरुपात ऑनलाइन पद्धतीने प्रथम सत्रच्या परीक्षा सुरू आहेत. यात गैरप्रकार होता कामा नये, म्हणून ‘प्रॉक्‍टर्ड’ ही प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र, काही विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार करताना सापडले आहेत.
विद्यापीठाच्या 224 अभ्यासक्रमांसाठी परीक्षा होत असून, साधारण सहा लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाइल, लॅपटॉप, कम्प्युटर अशा कोणत्याही साधनांचा वापर करून परीक्षा देता येत आहे.

मात्र, याचाच गैरफायदा विद्यार्थी घेत असल्याचे आढळून आले आहे. या परीक्षेत एका विषयाचा पेपर हा केवळ 50 गुणांचा असून, विद्यार्थ्यांना एका तासात सोडवायचा आहे. परीक्षा प्रक्रिया एवढी सोपी असतानाही गैरप्रकार होत आहेत. गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी इंजिनीअरिंग शाखेचे आहे. त्यानंतर बीएस्सी कम्प्युटर अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही गैरप्रकार करताना आढळून आले आहे.

विद्यार्थ्यांवर होणार कारवाई
गतवर्षीप्रमाणे यंदादेखील ऑनलाइन परीक्षेत इतर साधनांचा वापर, तसेच गुगल सर्च करून परीक्षा देता येईल, असे काही विद्यार्थ्यांना वाटले. मात्र, प्रॉक्‍टर्ड पद्धतीने ऑनलाइन परीक्षेत ‘स्क्रीनशॉट’ काढून परीक्षा देणाऱ्या 350 पेक्षा अधिक विद्यार्थी निदर्शनास आले आहे. या विद्यार्थ्यांचे पीआरएन क्रमांक, वेळ, कोणते प्रश्‍न होते अशा सर्वांची माहिती विद्यापीठाने जमा केली आहे. या विद्यार्थ्यांवर आता कॉपी प्रकरणानुसार कारवाई होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here