चौफेर न्यूज – UPSC लोकसेवा परीक्षा २०२०ची पूर्वपरीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाचा कहर सुरू असतानाच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने २७ जूनला हणारी ही नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, या परीक्षेसाठी नवीन तारीख ठरवण्यात आली आहे. ही परीक्षा १० ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती यूपीएससीकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून IAS, IFS आणि IPS या पदांच्या भरतीसाठी प्राथमिक परीक्षा आयोजित केली होती. एकूण ७१२ पदे ही ग्रुप ए आणि ग्रुप बीमधून निवडली जाणार होती. त्यासाठी २७ जूनला परीक्षा घेतली जाणार होती तसेच यासाठीचे फॉर्म ४ मार्च २०२१ला जारी करण्यात आले होते. दरम्यान, या परीक्षेत पास झालेले उमेदवारच मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात.

दरम्यान कोरोनाच्या कहरामुळे गेल्या वर्षीही या परीक्षेवर परिणाम झाला होता. अखेर यूपीएससीची प्राथमिक परीक्षा २०२० ही ४ ऑक्टोबरला घेण्यात आली होती. कोरोनामुळे वारंवार ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. इतकंच नव्हे तर इतर परीक्षांवरही कोरोनाचा परिणाम पाहायला मिळाला.

आयोग दरवर्षी तीन टप्प्यात प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत यामध्ये ही परीक्षा घेते. या परीक्षेद्वारे IAS, IFS आणि IPS अधिकारी निवडले जातात. ही परीक्षा २७ जूनला होणार होती. मात्र कोरोनाची सद्यस्थिती पाहता ही परीक्षा १० ऑक्टोबरला आयोजित केली जाणार आहे.

प्राथमिक परीक्षेत दोन पेपर पर्यायी उत्तर असलेल्या प्रश्नांचे असतील. यातील गुण मेरिट लिस्टमध्ये सामील केले जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here