चौफेर न्यूज – श्री संत सेना महाराज प्रेरित जिवा महाला खानदेश नाभिक मंडळ पिंपरी चिंचवड पुणे व श्री संत सेना महाराज एकता नाभिक मंडळाचे काही ठराविक कार्यकर्त्यांनी एकत्र येवुन या करोनाच्या महामारी मुळे सर्व नाभिक बंधूंचे कमवण्याच्या साधन म्हणजे सलुन दुकाने बंद केली आहेत

त्यामुळे समाजावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणुन समाजातील काही ठराविक कार्यकर्ते एकत्र येवुन एक उपक्रम राबवला की समाजातील ज्या बंधुंना कुठल्याही प्रकारची कमाई नाही अशा समाज बांधवाला एक महिन्याचा किराणा द्यावा अशी संकल्पना मांडली त्याला समाजातील दानशूर व्यक्तिंना आव्हान करण्यात आले त्याला समाजातील दानशूर व्यक्तिंनी खुप मोठा प्रतिसाद दिला आणि आम्ही एकुण नव्वद कुटुंबांना रू. ३०००/- चे किराणा किट वाटण्यास यशस्वी झालोत त्यासाठी समाजातील श्री अरविंद सैंदाणे श्री विलास महाले श्री रामदास सैंदाणे श्री रविंद्र फुलपगार श्री लोटन शिरसाठ श्री सुनिल पगारे श्री रामदास सैंदाणे (खेड) या सर्वांनी पुढाकार घेतला आणि उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तिंना धन्यवाद देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here