चौफेर न्यूज – करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) दि. 27 जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा आता 10 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे यूपीएससीने स्पष्ट केले आहे.
सध्या देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट निर्माण झालेले आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. याशिवाय, रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. सर्व बोर्डाने दहावी परीक्षा रद्द केली आहे. तर, राज्य सरकारने ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलली आहे.
आता करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेऊन यूपीएससीने परीक्षा पुढे ढकलली आहे. या परीक्षेसाठी देशभरातील लाखो उमेदवार देत असतात. यासंदर्भात यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.