चौफेर न्यूज – आज दिनांक 31/7/21 शनिवार प्रचिती पब्लिक स्कूल येथे “लोकमान्य टिळक पुण्यतिथी ” साजरी करण्यात आली.
“मनुष्य स्वभावतः कितीही
चांगला असला
तरीशिक्षणाने त्याच्या
बुद्धीचा विकास झाल्याशिवाय
देशाची उन्नती होत नाहीं.”
कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक श्री राहुल पाटील उपस्थित होते व त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमा पूजनाने केली.
कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षिका अनिता पाटील, अर्चना देसले, ज्योती खैरनार व शिक्षेकेतर कर्मचारी संगीता कोठावदे इत्यादी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे सुंदर असे छायाचित्रे काढले व रंगभरण स्पर्धा, इंग्लिश हस्ताक्षर स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत.
कार्यक्रमात विद्यार्थांनी छानसे भाषण सादर केले
1 . प्रत्युश राहुल नांद्रे
2. हार्दिक विलास कुवर
3.हर्षदा संदीप शेवाळे
4. लक्ष्मीकांत संतोष साबळे
5. स्वयंम योगेश भदाणे