चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऑनलाईन लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी मॅम, प्राचार्य सौ. वैशाली लांडे मॅम, व्यवस्थापक श्री वैभव सोनवणे सर ,श्री तुषार देवरे सर, एक दिवसीय उपप्राचार्य नितीन सर यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक गौतम वाघ सरांनी लोकमान्य टिळकांचा जीवन परिचय व टिळकांच्या सामाजिक कार्याविषयी महत्व विशद केले. तसेच नर्सरी ते सिनियर केजी च्या विद्यार्थ्याची स्पर्धा घेण्यात आली .इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची इंग्लिश हस्ताक्षर लेखन स्पर्धा घेण्यात आली, विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले व पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन माध्यमाने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी लोकमान्य टिळकांचे चित्र रेखाटन व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. वैष्णवी थोरात मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन व सुंदर रांगोळी रेखाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांनी व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.