चौफेर न्यूज – एक ऑगस्ट रोजी मैत्री दिनाचे औचित्य साधून 30 जुलैला संध्याकाळी सात वाजता सदानंद हॉटेल बाणेर येथून ३० सायकल स्वार रात्रीच्या अंधारामध्ये २१० किलोमीटर अंतर पार करून 13 तासांमध्ये वाई येथे पोहोचले, वाटेमध्ये रिमझिम पाऊस लागला कात्रज चा घाट आणि खंबाटकी घाट हे परीक्षा पाहणारी चढ सर्व सायकल स्वारांनी लीलया पार केले. दरम्यान इंडो अथलेटिक्स सोसायटीचे कृष्णलाल बंसल यांचे दहा हजार किलोमीटर सायकलिंग देखील पूर्ण झाले.
पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे अशा विविध ठिकाणाहून संस्थेच्या सदस्यांनी सायकल राईड मध्ये भाग घेतला. वाई येथे कृष्णाबाई संस्थान भीमकुंड आळी वाई यांनी सर्व सायकल स्वरांचे उत्साहाने स्वागत केले डॉ. चिंतामणी केळकर, डॉ.शैलेश धेडे , भास्कर रास्ते व केदार वनारसे हे उपस्थित होते , असे सदस्य गजानन खैरे यांच्यातर्फे सांगण्यात आले.
नियोजनामध्ये इंडो अथलेटिक्स सोसायटीचे सदस्य गणेश भुजबळ , अजित पाटील,अजय दरेकर,गिरीराज उमरीकर नागेश सलियन ,अजित गोरे , संतोष इंगळकर, सय्यद मुल्ला आदींनी मोलाचे सहकार्य केले.